राज्यात आतापर्यंत 115 इंच पाऊस

0
33

अधिकृतरित्या राज्यातील मान्सून संपण्यास आता अवघे 12 दिवस शिल्लक राहिलेले असून यंदा पाऊस सामान्य झाल्याचे पणजी वेधशाळेने स्पष्ट केले आहे. आतापर्यत राज्यात 2905 मीमी एवढा पाऊस झालेला आहे. म्हणजेच इंचांच्या हिशेबात यंदा राज्यात 115 इंच एवढा पाऊस झालेला असून हे प्रमाण सामान्य असेच म्हणावे लागणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. यंदा राज्यात जून महिना जवळजवळ कोरडाच गेला. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांबरोबरच राज्य सरकारसाठीही ती चिंतेची बाब ठरली होती. मात्र, नंतर 27 जून ते 27 जुलै ह्या एका महिन्याच्या काळात मोसमातील अर्धा पाऊस कोसळला. परिणामी जून महिन्यातील तुटही भरून आली.