हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने आज 13 मे व उद्या 14 मे रोजी गोव्यातील विविध भागांत सुसाट वारा व गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
यापूर्वी हवामान खात्याने गोव्यात 12 व 13 मेपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, आता हवामान खात्याने त्यात आणखी एका दिवसाची वाढ केली असून 14 मेपर्यंत राज्यातील विविध भागांत गडगडासह पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले अहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पावसाबरोबरच यावेळी राज्यात ताशी 30 ते 40 किमी ह्या वेगाने वारेही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने नमूद केले आहे. राज्यातील काही भागांत 18 मेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत फोंडा तालुक्यात 38.2 मी. मी. तर वाळपई येथे 29.4 मी. मी. एवढ्या पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.