राज्यात आज व उद्या पावसाची शक्यता

0
6

येथील हवामान विभागाने राज्यात 23 व 24 सप्टेंबरला पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात आत्तापर्यंत विक्रमी 165.94 इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण 43.5 टक्के जास्त आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, शनिवारपासून काही भागात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. पणजी, ओल्ड गोवा, साखळी, काणकोण, दाबोळी, मुरगाव, मडगाव या भागात पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने सोमवार 23 सप्टेंबरसाठी एलो अलर्ट आणि मंगळवार 24 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.