राज्यात आजपासून पावसाची शक्यता

0
13

येथील हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात मंगळवार ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबरपर्यंत चार दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ६ व ७ रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर, ८ व ९ रोजी काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात चोवीस तासांत काही ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ९४.११ इंच पावसाची नोंद झाली आहे.