गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला आज सोमवार दि. २ एप्रिलपासून प्रारंभ होत असून २१ एप्रिल पर्यंत परीक्षा चालणार आहे.
राज्यातील डिचोली, वास्को, पर्वरी, वाळपई, कुडचडे, केपे, शिरोडा, कुंकळ्ळी, शिवोली, मांद्रे, माशे, पिलार, साखळी, काणकोण, मडगाव, वेर्णा, म्हापसा, माशेल, नावेली, फोंडा, पेडणे, पणजी, तिस्क- धारबांदोडा, हळदोणा, सांगे, कळंगुट या केंद्रांतून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. २ एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत नियमित व व्यावसायिक विषयांची परीक्षा होणार आहे. १३ ते २१ दरम्यान एनएसक्यूफ, सीडब्लूएसएन विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे.
नियमित व इतर विषयांची परीक्षा ठरलेल्या वेळेत घेतली जाणार आहे. नियमित विषयांची परीक्षा सकाळी ९.३० ते दुपारी १२ यावेळेत घेण्यात येणार आहे. २ रोजी – प्रथम भाषा, ३ रोजी – फ्लोरिकल्चर, ४ रोजी – गणित, ५ रोजी – द्वितीय भाषा, ६ रोजी – व्यावसायिक, ७ रोजी – सोशल सायन्स पेपर – १, ९ रोजी – सोशल सायन्स पेपर – २, १० रोजी – व्यावसायिक, ११ रोजी – विज्ञान, १२ रोजी – तृतीय भाषा विषयाचा पेपर होणार आहे, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.