राज्यात आजपासून उकाड्यात वाढ शक्य

0
4

येथील हवामान विभागाने राज्यात 22 ते 24 एप्रिल दरम्यान उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तापमान आणि आद्रता वाढल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पणजी येथे चोवीस तासांत कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. नागरिकांनी कडक उन्हात जाऊ नये, मोकळ्या जागी मोठी गर्दी करू नये, बाहेर काम करताना वारंवार विश्रांती घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.