>> मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
राज्यातील वाळू उपसा कायदेशीर करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीत काल दिले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरिष्ठ सरकारी अधिकार्यांची बैठक घेऊन वाळू उपसा, चिरेखाणी आदी विषयावर चर्चा केल्यानंतर वरील निर्देश दिले. वाळू उपसा करण्यासाठीचे प्रलंबित अर्ज निकालात काढण्याची सूचना केली आहे.
बेकायदेशीर वाळू, चिरे काढणार्यांवर कारवाई, शेजारील राज्यातून वाळू व गौण खनिज आणण्यासाठी ऑनलाईन पास पद्धत कार्यान्वित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्य सचिव, सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.