राज्यातील तापमान 2 अंशांनी घटले

0
4

राज्यातील किमान तापमानात 2 अंशांनी घट झाली असून थंडी जाणवू लागली आहे. मागील काही दिवसात राज्यातील थंडी गायब झाली होती. तथापि, चोवीस तासांत राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागातील किमान तापमानात घट झाल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. मुरगाव येथे किमान तापमानात 3.1 अंशांनी घट नोंद झाली आहे. राज्यात आगामी काही दिवस कमाल तापमान 33-32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संध्याकाळच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे. राज्यात धुके पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.