मान्सूनने देशभरातून माघार घेतल्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात तापमानाचा पारा वाढणार असून ‘ऑक्टोबर हिट’ चा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात आता कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस एवढे असेल, असे खात्याने म्हटले आहे. पुढील पाच दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. ही वाढ १ ते २ अंश सेल्सिअस एवढी असेल. हिवाळा ऋतू सुरू होण्यास अजून काही कालावधी असला तरी सध्या रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे.