लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी हजारो लोकांनी काल रविवारी मोर्चा काढला. कडाक्याच्या थंडीत लेहच्या रस्त्यावर हजारो स्त्री-पुरुषांनी निदर्शने केली. त्यामुळे लडाखमध्ये काल संपूर्ण बंद पाळण्यात आला. लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांनी संयुक्तपणे हे आंदोलन आयोजित केले होते. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, राज्यघटनेची सहावी अनुसूची लागू करावी आणि लेह आणि कारगिलला संसदेत स्वतंत्र जागा द्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, संविधानाची सहावी अनुसूची लागू करावी आणि लेह आणि कारगिलला संसदेत स्वतंत्र जागा द्याव्यात, अशी लोकांची मागणी आहे.