मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील आर्थिक तूट ही १६०० कोटी रु. एवढी असल्याचे जे म्हटलेले आहे ते खोटे असून ही तूट ४६४८ कोटी रु. एवढी असल्याचे आपण पत्रकार परिषदेत दाखवून दिलेले होते. पण त्या गोष्टीला आता कित्येक दिवस होऊन गेलेले असताना अजूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याबाबत खुलासा केला नसल्याचे काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
सरकार दर महिन्याला १०० कोटी रु. चे कर्ज काढणार असल्याची भविष्यवाणी आपण केली होती. मात्र, जानेवारी महिन्यात सरकारने ती खोटी ठरवली. पण फेब्रुवारी महिन्यात सरकार ती खोटी ठरवू शकली नसल्याचे सांगून सरकारने १०० कोटी कर्जासाठीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
अमली पदार्थाचा दावा खोटा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या डिचोली तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगा अमली पदार्थांचे सेवन करीत असतानाचा व्हिडिओ वायरल झाल्याने राज्यात अमली पदार्थांचा व्यवहार होत नाही असा दावा करणार्या मुख्यमंत्र्यांचा दावा किती खोटा आहे हे सिद्ध झाले असल्याचे काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.