राज्याचे शॅक धोरण येत्या आठ दिवसांत अधिसूचित करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मुंबई उच्च न्यायालयात काल दिली. राज्यातील पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला तरी अजूनही शॅक धोरण निश्चित झाले नाही. त्याबाबत दाखल एका याचिकेवरील सुनावणी वेळी सरकारने ही माहिती दिली. दरम्यान, राज्यात एकूण 359 शॅक उभारणी साठी मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शॅक धोरणावर चर्चेसाठी सोमवारी खास बैठक घेतली होती.