राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली. या 12 जागांपैकी प्रत्येकी 2 जागा आसाम, बिहार, महाराष्ट्रातील आहेत, तर प्रत्येकी 1 जागा हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिशातील आहे.