राज्यसभा खासदार निवडणुकीसाठी निर्धारित मुदतीत भाजपचे उमेदवार सदानंद शेट तानावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे सदानंद तानावडे यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर केली जाणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी शुक्रवार दि. 14 जुलै रोजी केली जाणार आहे.