अवकाळी पावसाचा सामना आणखी काही दिवस राज्यातील नागरिकांना करावा लागणार असून, बुधवार दि. २७ रोजी राज्याच्या काही भागांत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी ४० ते ५० किमी एवढ्या वेगाने वारे वाहणार असल्याचेही खात्याने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजधानी पणजीसह राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ तर उडालीच. शिवाय आंबा, काजू बागायतीसह अन्य पिकांवरही विपरित परिणाम झाला आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार असून, ती वाढ १ ते २ अंश डिग्री सेल्अइस एवढी असेल. काल राज्यात जेवढे तापमान होते, त्यापेक्षा १ ते २ अंश डिग्री सेल्अइस एवढी ही वाढ असेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.