राजीव गांधी फाउंडेशनसह ३ ट्रस्टच्या चौकशीचे आदेश

0
141

राजीव गांधी फाउंडेशनच्या निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित होत असताना आता केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने एक समिती गठीत केली असून ती फाउंडेशनच्या निधीची चौकशी करणार आहे.

बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती गठीत केली आहे, जी राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करेल.

यासाठी एक समिती गठीत केली असून ती फाउंडेशनच्या निधीची चौकशी करणार आहे. या समितीचे अध्यक्ष विशेष संचालक (अमलबजावणी संचालनालय) सिमांचल दास असतील. या चौकशीत पीएमएलए कायद्यातील नियमांचे उल्लंघन, आयकर कायदा, एफसीआरए कायद्याची चौकशी केली जाईल. समितीचे अध्यक्ष ईडीचे विशेष संचालक असतील.