सध्या देशभरात गाजत असलेल्या राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांनी मंगळवारी सोनम आणि राजसह 5 आरोपींना अटक केली. त्यांना शिलाँगला आणण्यात आले आहे. काल 11 जून रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सोनमसह सर्व आरोपींना 8 दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंदने बुधवारी इंदूरमध्ये राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांची भेट घेतली व सोनमने चूक केली आहे, तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी केली. 11 मे रोजी लग्नानंतर राजा-सोनम 21 मे रोजी शिलाँगला पोहोचले. 23 मे रोजी कुटुंबाशी शेवटचे बोलणे झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. 17 दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम 9 जून रोजी गाजीपूरमध्ये सापडली. त्यानंतरच हत्येचा गुन्हा उघडकीस आला.