राजधानी दिल्लीत जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

0
16

राजधानी नवी दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.८ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता.तसेच भूकंपाची तीव्रता मोठी असल्यानं जम्मू काश्मीरपर्यंत याचा प्रभाव जाणवला. दिल्लीतील नागरिकांनीदेखील भूकंपाची तीव्रता अनुभवली. अद्याप कसलिही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले.