राजदीप सरदेसाईंच्या सुरक्षेबाबत राजनाथ सिंहना पत्र

0
89

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी राजदीप सरदेसाई व रवीश कुमार या ज्येष्ठ पत्रकारांना धमक्या दिल्या जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून उभय पत्रकारांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याची विनंती केली आहे. विचारवंत नरेंद्र दाभोलकर, एम. एन. कलबर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या अलीकडील काळात झालेल्या हत्यांचा विचार करून या संदर्भात कृती करावी असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.