अजिंक्य रहाणे हा सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून कार्यरत आहे. कसोटी प्रमाणेच त्याच्याकडे वनडेतही सरस कामगिरी करण्याची मता आहे आणि हे त्याने बर्याचदा सिद्धही करून दाखवलेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्याला वन-डे मध्ये स्थान देण्यात येत नाहीये. तो त्याच्यावर एक प्रकारचा अन्यायच होत असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू तथा विद्यमान समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले.
अजिंक्यने वनडेत चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करूनही त्याला संधी न मिळणे हा त्याच्यावर झालेला अन्यायच आहे. ज्याप्रमाणे आपण दुधात पडलेली माशी बाहेर काढतो त्याप्रमाणे अजिंक्यला वागणूक देण्यात आली आहे, असे परखड विधान चोप्राने केले.
भारतीय टीम आजही पारंपरिक पद्धतीने खेळते. इंग्लंडसारखे आपण फटकेबाजी करून प्रत्येक सामन्यात ३५० धावा करण्याचा प्रयत्न करत नाही. पहिल्यांदा मैदानावर स्थिरावून, भागीदारी करुन भारतीय टीम ३०० धावांचे लक्ष्य पार करतो. मग या परिस्थितीत अजिंक्य रहाणे नक्कीच फायदेशीर असल्याचे आकाश चोप्रा म्हणाले. चोप्राच्या मते अजिंक्यला पुन्हा एकदा टीम