गवंडाळी-जुने गोवे येथे काल दुपारी मारुती कारगाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक लाडू मोसर्डेकर (54 वर्षे, रा. वाळपई) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला गोमेकॉमध्ये दाखल केले आहे. राज्यातील रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हा अपघात झाला.