आजपासून अंमलबजावणी?
राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी सर्व नवीन वाहनासाठी रस्ता शुल्कात ५० टक्के कपातीच्या निर्णयाला काल मान्यता दिली आहे. या रस्ता शुल्क कपातीच्या निर्णयाची अंमलबाजणी आज शुक्रवारपासून करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. राज्यातील वाहन उद्योगाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तीन महिन्यासाठी रस्ता शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बिकट आर्थिक स्थितीचा वाहनांच्या विक्रीवर विपरित परिणाम झालेला आहे. गेले पंधरा दिवस वाहन चालक या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.