रशियाला युद्ध थांबवायला सांगा

0
16

>> युक्रेनचे भारताला आवाहन

>> ११ हजार रशियन सैनिक ठार केल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बातचीत करून युक्रेनविरोधातील युद्ध थांबवण्यास सांगा असे आवाहन केले. युक्रेन हा भारताच्या अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचा देश आहे, त्यामुळे हे युद्ध थांबवणे भारताच्याही हिताचे असल्याचे यावेळी कुलेबा यांनी सांगून भारताची रशियाशी मैत्री आहे. त्यामुळे पितुन यांना भारताने समजवावे असे कुलेबा यांनी सांगितले.

यावेळी युक्रेनने परराष्ट्र मंत्री कुलेबा यांनी, युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला प्रभाव वापरावा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलावे, असे सांगितले. भारतातील निर्यातीसह जागतिक कृषी बाजारावरही आक्रमणाचा परिणाम होत असल्याचे सांगितले. भारत हा युक्रेनियन कृषी उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि हे युद्ध असेच चालू राहिल्यास, नवीन पीक पेरणे आणि उत्पादन घेणे आपल्यासाठी कठीण होईल. त्यामुळे जागतिक अन्न सुरक्षा आणि भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीने, हे युद्ध थांबवणे महत्वाचे आहे, असे कुलेबा यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांच्या अध्यक्षांशी ङ्गोनवर यापूर्वी संवाद साधला होता. गेल्या महिन्याच्या २४ तारखेला रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली होती. दोन दिवसांनंतर म्हणजेच २६ ङ्गेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी ङ्गोनवर चर्चा केली होती. युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी पंतप्रधान मोदींकडे या युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

११ हजार रशियन सैनिक
मारल्याचा युक्रेनचा दावा
रशिया – युक्रेनमधील युद्धाचा काल ११ वा दिवस होता. या युद्धात आतापर्यंत आम्ही रशियाचे ११ हजार सैनिक मारले आहेत असा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधून सुरू असलेल्या या युद्धात रशियाला मोठा ङ्गटका बसल्याचा दावा युक्रेन करत आहे. युद्धात आतापर्यंत ११ हजारांहून अधिक रशियन सैनिक ठार झाले आहेत. तसेच नष्ट केलेल्या शस्त्रांमध्ये ४८ हेलिकॉप्टर, २८५ टँक, ४४ लष्करी विमाने, ६० इंधन टाक्या, २ बोटी आणि इतर शस्त्रे असल्याचे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे. आतापर्यंत युक्रेनमधील १५ लाख नागरिकांनी देश सोडून शेजारच्या देशांत आश्रय घेतला आहे.

दरम्यान, युद्धकाळात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये दोन ङ्गेर्‍यांमधील चर्चा झाली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तिसर्‍या ङ्गेरीतील चर्चा ही आज सोमवारी होणार आहे.