कोलवा पोलिसांनी एका रशियन पर्यटकास वायरलेस फोनचा वापर केल्याप्रकरणी अटक केली. त्याचे नाव अलेक्सेई कामीनीन (38) असे आहे. तो बाणावली येथील रिसोर्टजवळ भारतात वापरण्यास बंदी असलेल्या सीमकार्ड व सेटलाईट मोबाइलचा वापर करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या मागावर राहून कारवायांवर लाक्ष ठेवले. खात्री पटल्यानंतर त्याला अटक केली.पोलिसांनी त्या वस्तू जप्त केल्या. त्याचा पुढील तपास चालू आहे.