सीबीआयचे अतिरिक्त संचालक आर. के. दत्ता हे आता २जी स्पेकट्रम घोटाळा प्रकरणाच्या तपासकामाचे प्रमुख म्हणून ताबा घेणार आहेत. या तपासकामाचे याआधी प्रमुख असलेले मुख्य संचालक रणजीत सिन्हा यांना सर्वोच्च न्यायालयाने बाजूला होण्याचा आदेश दिल्यानंतर ही जबाबदारी दत्ता यांच्यावर सोपवली आहे. भारतीय पोलीस सेवेच्या १९८१च्या तुकडीतील अधिकारी असलेले दत्ता हे कर्नाटकमधील आहेत.