>> दक्षिणेतील इस्पितळांना रक्त मिळणे कठीण
रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्त हवे असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन हॉस्पिसियू इस्पितळातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका हॉस्पिसियो इस्पितळातील रक्तपेढीलाही बसला असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली.
सध्या कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन असल्याने रक्तदान शिबिरे होत नसल्याने मडगावमधील हॉस्पिसियो इस्पितळातील रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा होत नसल्याने या रक्तपेढीत रक्ताची कमतरता निर्माण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हॉस्पिसियू इस्पितळातील रक्तपेढीत रक्ताची कमतरता निर्माण झाल्याने दक्षिण गोव्यातील अन्य इस्पितळांनाही रक्त मिळणे कठीण होऊन बसले असल्याचे, सूत्रांचे म्हणणे आहे.