येत्या विधानसभेत प. बंगालात भाजपचे सरकार ः अमित शहा

0
239

पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल भाजपला एक संधी द्या आम्ही बंगालचे सोने करू असे आश्‍वासन दिले. यावेळी शहा यांनी, तृणमूल कॉंग्रेसवर निशाणा साधला. ममता बॅनजी यांचे तृणमूल सरकार जनतेची अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही, असे सांगून आम्हाला एक संधी द्या असे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत २०० हून अधिक जागांसह बंगालमध्ये सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला.
ममता बॅनर्जी यांचा केवळ एकच उद्देश आहे. तो म्हणजे आपल्या भाच्याला पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा, असे सांगत बंगाली जनतेला वंशवादी शासन हवे आहे का, असा सवालही शहा यांनी केला. राजकीय हत्यांबाबत देखील पश्चिम बंगाल सर्वात वाईट स्थितीत आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये १०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत, असे सांगत तुम्ही या प्रकरणात श्वेतपत्रिका का काढत नाहीत, असा सवालही शहा यांनी ममतांना विचारला आहे.