2024 साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच पुन्हा सत्तेवर येईल हे काल झालेल्या राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश ह्या राज्यांतील विधानसभा निवडणूक निकांलावरून स्पष्ट झाले आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल प्रतिक्रिया देताना सांगितले.
मोदी हे एक विश्वगुरू असून ते जागतिक नेते आहेत. हा विजय नरेंद्र मोदी यांचा आहे. जनतेला नरेंद्र मोदींवर विश्वास आहे व त्यांच्या विविध योजनांचा देशातील जनतेला फायदा होत आहे, असे राणे म्हणाले.
आपण पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता असून माझ्यावर कर्नाटक व मध्यप्रदेश ह्या राज्यांत प्रचार करण्याची जबाबदार सोपवण्यात आली होती. तेथे जाऊन आपण प्रचार करताना भाजपच्या ध्येय धोरणाविषयी मतदारांना माहिती दिल्याचे राणे म्हणाले. राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेश येथे झालेल्या निकालावरून देशातील जनतेला केंद्रात परत एकदा नरेंद्र मोदी यांचेच सरकार हवे आहे, हे स्पष्ट झाले असल्याचे राणे म्हणाले. 2024 साली मोदी सरकार स्व:बळावर बहुमत प्राप्त करेल याविषयी आता कुणी शंका घ्यायची गरज नसल्याचे ते म्हणाले.