येत्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ८ ते ८.५ टक्के राहणार

0
20

>> आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल सोमवार दि. ३१ जानेवारीपासून सुरू झाले. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ सादर करण्याच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. या आर्थिक सर्वेक्षणात अहवालात पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ८ ते ८.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोविडपूर्व काळात असलेल्या अर्थव्यवस्थेच्या काळात (वर्ष २०१९-२०) आली असल्याचेही आर्थिक अहवालात नमूद केले आहे.

आज अर्थसकंल्प
आज दि. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करतील. २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशाची वास्तविक जीडीपी वाढ ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.