येडीयुरप्पा, नक्वी भाजपाचे उपाध्यक्ष

0
92

अमित शहांनी केली नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची नियुक्ती
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल आपली ४७ जणांची नवी टीम जाहीर केली असून या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांमध्ये त्यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांची उपाध्यक्षपदी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लावली आहे. विशेष म्हणजे खासदार तथा माजी सरचिटणीस वरुण गांधी यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही.
पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये शाहनवाज हुसेन यांचा प्रथम क्रमांक असून पत्रकार एम. जे. अकबर यांचाही १० प्रवक्त्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शहा यांनी जाहीर केलेली यादी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष – बंडारू दत्तात्रेय (तेलंगण), बी. एस. येडीयुरप्पा (कर्नाटक), सत्यपाल मलिक (उ. प्र.), मुख्तार अब्बास नक्वी (उ. प्र.), पुरुषोत्तम रुपाला (गुजरात), प्रभात झा (गुजरात), रघुवर दास (झारखंड), किरण माहेश्‍वरी (राजस्थान), विनय सहस्त्रबुद्धे (महाराष्ट्र), रेणू देवी (बिहार), दिनेश शर्मा (उ. प्र.).
सरचिटणीस ः जगत प्रकाश नड्डा (हिमाचल प्रदेश), राजीव प्रताप रुडी (बिहार), मुरलीधर राव (तेलंगण), राम माधव (आंध्रप्रदेश), सरोज पांडे (छत्तीसगढ), भूपेंद्र यादव (राजस्थान), प्रा. रामशंकर कथेरिया (उ. प्र.), रामलाल (दिल्ली).
संयुक्त सचिव (संघटन)ः व्ही. सतीश (कर्नाटक), सौदन (छत्तीसगढ), शिव प्रकाश (उ. प्र.), बी. एल. संतोष (कर्नाटक). सचिव ः शाम जाजू (महाराष्ट्र), डॉ. अनिल जैन (दिल्ली), एच. राजा (तामिळनाडू), रोमेन डेका (आसाम), सुधा यादव (हरयाणा), पूनम महाजन (महाराष्ट्र), रामविचार नेताम (छत्तीसगढ), अरुण सिंग (उ. प्र.), सिद्धार्थ नाथसिंग (उ. प्र.), सरदार आर. पी. सिंग (दिल्ली), श्रीकांत शर्मा (उ. प्र.), ज्योती ध्रूव (मध्य प्रदेश), तरुण चुघ (पंजाब), रजनीश कुमार (बिहार).
प्रवक्ते ः शाहनवाज हुसेन (बिहार), डॉ. सुधांशू त्रिवेदी (उ. प्र.), मीनाक्षी लेखी (दिल्ली), एम. जे. अकबर (दिल्ली), विनय शंकर शास्त्री (उ. प्र.), ललिता कुमार मंगलम (तामिळनाडू), नलीन कोहली (दिल्ली), डॉ. संबित पात्रा (ओडिसा), अरुण बालुनी (उत्तराखंड), जी. व्ही. नरसिंह राव (आंध्र प्रदेश).
मोर्चा अध्यक्ष ः महिला मोर्चा – विजया राहतार (महाराष्ट्र), अनुराग ठाकूर (हिमाचल प्रदेश), एस. सी. मोर्चा – दुष्यंत गौतम (दिल्ली).