‘यूसीसी’बाबत संसदीय समितीची 3 जूनला बैठक

0
11

कायदा आणि सुव्यवस्थेवरील संसदीय समितीने समान नागरी संहिता (यूसीसी) संदर्भात येत्या 3 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. यूसीसीवर मसुदा तयार करणाऱ्या विधी आयोगालाही या बैठकीत बोलावण्यात आले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला 31 खासदार आणि समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत समान नागरी संहितेबद्दल सर्वांचे मत जाणून घेतले जाईल आणि त्यावर विचारविनिमय केला जाईल. 27 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये भाजपच्या 10 लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना, देशभरात समान नागरी संहिता लवकरच लागू करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर आता हा कायदा लागू होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.