यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

0
22

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे (यूपीएससी) निकाल जाहीर झाले असून, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसून आले होते; यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी ही आली आहे. 2023मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल जाहीर केले आहेत.