गोवा सरकारने हल्लीच जाहीर केलेल्या युवा संवाद योजनेचा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता गोवा कला अकादमी संकुलात व मडगावच्या बाबू नायक सभागृहात सायंकाळी ५ वा. होणार आहे.
गोवा कला अकादमी संकुलात होणार्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित राहतील. राज्य शंभर टक्के तंत्रज्ञानयुक्त करण्याच्या योजनेचाच हा भाग आहे.
वरील योजनेखाली १६ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना दरमहा शंभर मिनिटे मोफत टॉक टाईम व ३ जीबी इंटरनेट मोफत डेटा, अशी ही योजना आहे. व्होडाफोन कंपनीने वरील सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून पाच वर्षे गोव्या वास्तव्य असल्याचा कोणताही दाखला सादर करणारे युवक-युवती या योजनेस पात्र आहेत. आजपासून कंपनी प्रत्येक गावात युवकांची नांवनोंदणी करण्यासाठी दालने खुली करतील.
डिजिटल क्रांती करण्यासाठीचा या योजनेचा सर्व युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाने केले आहे.