युवा पिढीने विदूषक कलेचे प्रशिक्षण घ्यावे

0
4

आंतरराष्ट्रीय विदूषक मार्टीन फ्युबर यांचे आवाहन

10 देशांतील विदूषकांचे गोव्यात आगमन

आजच्या काळात जगभरात विदूषकांना आदर, सन्मान दिला जात आहे. त्यामुळे युवा पिढीला विदूषक कलेचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. विदेशात विदूषक शिक्षण देणारी विद्यालये कार्यरत आहे. भारतात विदूषक शिक्षण देणारी विद्यालये सुरू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विदूषक पुरस्कार विजेते, जागतिक विदूषक संघटनेचे माजी उपाध्यक्ष मार्टीन फ्युबर यांनी कला अकादमीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काल केले.

आंतरराष्ट्रीय विदूषक महोत्सवानिमित्त विदूषक मार्टीन फ्युबर यांचे गोव्यात आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत अर्जेंटिना, इटली, जर्मनी आदी 10 देशांतील विदूषकांचे गोव्यात आगमन झाले आहे.

आंतरराष्ट्रीय विदूषक महोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. या महोत्सवात भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये सुमारे 100 कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आत्तापर्यंत पुणे, कलकत्ता, मंगळूर या ठिकाणी 20 कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत, असे मार्टीन फ्युबर यांनी सांगितले.
विदूषक महोत्सवात कार्यक्रम सादर करण्याबरोबरच आनंद देणारे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले जातात. असेही फ्युबर यांनी सांगितले.