युवतीवर सामूहिक अत्याचार; 5 जणांना अटक

0
2

फातोर्डा येथून एका युवतीचे बळजबरीने अपहरण करून नंतर तिच्यावर कांसावली येथे सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पाच नराधमांना पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. सर्व संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी केपे येथील पीडित युवतीच्या आईने फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिल अब्दुल करीम लालसाब अलगुर (18, रा. चिखली वास्को) याने सदर गतिमंद तरुणीला मडगाव कदंबा बसस्थानकावर एकटी असल्याचे गाठून मैत्री केली व तिला बसने वास्कोला नेले. वास्को बसस्थानकावरून तिला दुचाकीवरून दाबोळी संगमापर्यंत नेले. त्या ठिकाणी अन्य चार जण हजर होते. यानंतर मोहमद अली मुल्ला हसनबाशा मुल्ला (22, रा. मांगोरहिल वास्को), शाहजाद मोहमद सामीन शेख (18, रा. टिळक मैदान, खारीवाडा, वास्को), विरेश अमरिश आग्वांदा (18, रा. गांधीनगर वास्को), मोहम्मद यासिर हबिबुल्ला शेख (18, रा. बोगदा सडा वास्को) यांनी तिला कारमधून कासावली येथे एका फ्लॅटमध्ये नेले. यानंतर पाचही जणांनी तिच्यावर सामूहिक बलत्कार केला. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत काल त्या पाचही जणाना अटक केली. संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.