युवकावर हल्लाप्रकरणी दोघे संशयित अटकेत

0
10

दावकोण-धारबांदोडा येथे देवेंद्र गावकर याच्यावर हल्ला केलेल्या कांता बेतकेकर (रा. कणकीरे-गुळेली) व महादेव गावडे (रा. नाणूस-उसगाव) या दोघांना कुळे पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. रुपयांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन त्याचे रुपांतर हल्ल्यात झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. बुधवारी पहाटे झोपलेल्या अवस्थेत देवेंद्र गावकर याच्यावर दोघांजणांनी घरात घुसून हल्ला केला होता. हल्लेखोरांनी देवेंद्र याच्या जवळ असलेला मोबाईल, सानसाखळी व रोख 20 हजार रुपये चोरून नेले होते. गुरुवारी गुन्हा नोंद केल्यानंतर संशयिताना कुळे पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.