विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी चार दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाबाबत नाराजी व्यक्त केली असून, सभापती रमेश तवडकर यांना काल एक पत्र पाठवून कामकाज सल्लागार समितीची बैठक तातडीने घेण्याची मागणी केली. आठव्या विधानसभेच्या तिसर्या अधिवेशनाचा कालावधी दोन ते तीन आठवड्यापर्यंत वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठक घेणे गरजेचे आहे.
तसेच, २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या नाताळ आणि नववर्ष स्वागत उत्सवांच्या दिवसांत तारांकित प्रश्न मांडण्याची मुदत देऊन आणि वेळापत्रक जाहीर करून एकप्रकारे आमदारांची कोंडी करण्यात आली आहे. विरोधी आमदारांना कामकाजात समान संधी द्यावी, अशी मागणी आलेमाव यांनी सदर पत्रातून केली आहे.