युपीचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह इस्पितळात

0
92

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कल्याणसिंह यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून ट्विटवरून पंतप्रधान मोदींनी कल्याणसिंह लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर कल्याण सिंह यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना एसपीजीआय रुग्णालयात हलवले आहे.