>> बाबूश यांचा आमदारकीचा राजीनामा
युनायटेड गोवन्स पार्टीने कॉंग्रेस पक्षाशी युती केली असून कॉंग्रेस पक्षाने आम्हांला पणजी व कुठ्ठाळी हे दोन मतदारसंघ दिले आहेत. मात्र, कुठ्ठाळी मतदारसंघात कॉंग्रेस व युनायटेड गोवन्स पार्टी अशा दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात असतील. या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत असेल, असे कॉंग्रेस पक्षाने सांगितले असल्याचे युनायटेड गोवन्स पार्टीचे नेते बाबुश मोन्सेर्रात यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
बाबुश मोन्सेर्रात व रमाकांत बोरकर यांनी काल युनायटेड गोवन्स पार्टीत रितसर प्रवेश केला. तत्पूर्वी, मोन्सेर्रात यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी बोलताना मोन्सेर्रात म्हणाले की, युनायटेड गोवन्स पार्टीतर्ङ्गे रमाकांत बोरकर हे कुठ्ठाळीतून निवडणूक लढवतील, पण तेथे कॉंग्रेसचा उमेदवार पूर्वीच ठरला होता. त्यामुळे कॉंग्रेसने तेथे आमचाही उमेदवार असेल, पण तुम्ही चिंता करू नका. तेथे मैत्रीपूर्ण लढत करूया, असे सांगितल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. कॉंग्रेसने आपणाला ज्या दोन जागा दिल्या आहेत त्यावर आपण समाधानी असल्याचे मोन्सेर्रात यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपणाला नवी दिल्लीला बोलावून घेतले होते. तेथे आपण पक्षश्रेष्ठींशी बोललो व दोन जागांचा प्रस्ताव स्वीकारला. गोवा ङ्गॉरवर्ड ही विजय सरदेसाई यांची पार्टीही या आघाडीत सहभागी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ङ्गक्त वेळ्ळीच्या जागेवरून कॉंग्रेस व गोवा ङ्गॉरवर्डची बोलणी अडून पडली आहेत. पण त्याबाबतीत तडजोड होईल, असा विश्वास मोन्सेर्रात यांनी व्यक्त केला.
… तर कॅसिनो बंद पाडणार
जर आपण पणजीतून आमदार म्हणून निवडून आलो तर सहा महिन्यांच्या आत मांडवी नदीतील कॅसिनो बंद पाडणार असल्याचे यावेळी मोन्सेर्रात यांनी आपल्या जाहीरनाम्याविषयी सांगितले. पुढील दोन-तीन दिवसांत आपण आपला जाहीरनामा जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.
१७ रोजी अर्ज भरणार
येत्या १७ रोजी आपण आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले.
पणजीत माझाच विजय
पणजीतून आपला विजय निश्चित असल्याचे विजयाविषयी तुम्हांला किती खात्री आहे असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले. आम
आदमी पार्टीला गोव्यात स्थान नाही. गोव्यात त्यांच्याकडे कार्यकर्तेही नाहीत. त्यामुळे पक्षकार्यासाठी त्यांना नवी दिल्लीतून कार्यकर्ते आणावे लागत असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. पणजीत आपली लढत भाजप उमेदवाराबरोबरच असल्याचे ते म्हणाले.
युनायटेड गोवन्स पार्टीचे कुठ्ठाळीचे उमेदवार रमाकांत बोरकर म्हणाले की, कुठ्ठाळीत आपला विजय निश्चित आहे. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे ही निवडणूक तुम्हांला जड जाईल असे वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले असता भ्रष्टाचाराचे आरोप कित्येक लोकांवर होत असतात. ते झाल्यानंतरही लोकांनी आपणाला सांकवाळ सरपंचपदी निवडून आणल्याचे ते म्हणाले.
युनायटेड गोवन्स पार्टीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी काल बाबुश मोन्सेर्रात व रमाकांत बोरकर यांना पक्षाच्या पणजी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षात रितसर प्रवेश दिला. यावेळी पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.