युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास तीव्र प्रत्युत्तर

0
0

भारताकडून पाकिस्तानला कडक इशारा

भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबार अथवा हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने काल युद्धबंदीचे उल्लंघन केले. कालही सीमेवर सीजफायर झाले. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. जर पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले तर आम्ही पाकिस्तानला तगडे उत्तर देऊ असा इशाराच भारतीय सैन्याने दिला आहे. भारतीय सैन्याची काल अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. यावेळी पाकिस्तानच्या कुरापतींचीही माहिती देण्यात आली आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानला कसा धडा शिकवला याची माहिती देतानाच पाकिस्तानचे किती मोठे नुकसान झाले याची माहितीही दिली आहे. आम्ही पाकिस्तानचे हायटेक फायटर पाडले आहेत. तसेच आपल्या एअरबेसवर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाकिस्तानचा हल्ला हा नाकाम केल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे.

पाकिस्तानला सज्जड ताकीद
त्यांनी केलेल्या उल्लंघनाचा आम्ही त्याच शब्दात उत्तर दिले आहे. तसेच पाकिस्तानने काय उल्लंघन केले याचीही माहिती आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला हॉटलाईनवरून दिली आहे. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास कडक शब्दात उत्तर दिले जाईल, असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे, अशी माहिती भारताचे डीजीएमओ राजीव घई यांनी दिली. तसेच पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ जशास तसे उत्तर देण्याचे आदेश आमच्या आर्मी प्रमुखांनी आम्हाला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितलं.

हल्ले परतवून लावले
हवाई दलाचे डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनीही या ऑपरेशन्सची माहिती दिली. 8 मे रोजी भारतीय हवाई दलाने लाहोर येथील पाकिस्तानी देखरेख रडार साईट्सला निशाणा बनवले. आम्ही ठरवून पाकिस्तानला उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. आम्ही हे सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानी ड्रोन आणि मानवरहीत प्रणालीने भारतीय एअरबेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिम आधीच तयार होत्या. त्यामुळे आम्ही पाकचे हल्ले परतवून लावले, असे अवधेश कुमार भारती म्हणाले.