युक्रेन आणि रशियामधील युद्ध ४०व्या दिवशीही सुरुच आहे. या दरम्यान रशियन सैनिकांनी सामूहिक नरसंहाराची घटना समोर आली आहे. युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ३७ किलोमीटरवर असणार्या बुचा शहरामधील सॅटेलाईट आणि व्हायरल फोटोमधून भयावह परिस्थितीचे वास्तव समोर आले आहे. शहरात जागोजागी मृतदेहांचा खच पडला असून, ४१० मृतदेह सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. अतिशय अमानुषपणे या नागरिकांचे हत्याकांड करण्यात आले आहे. तसेच चर्चजवळ सुमारे ४५ फुट लांब स्मशानभूमी दिसून आली आहे. बुचा येथे रशियन सैन्यानेच सामूहिक नरसंहार केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे, तर रशियाने नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.