गोव्याचा स्टार युवा स्क्वॉशपटू यश फडतेने नॉयडा, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या ११व्या इंडियन ज्युनियर ओपन स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीत धकड दिली.
शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यशने महाराष्ट्राच्या दीपक मंडलचा ११-३, ११-२, ११-४ असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत यशने उत्तर प्रदेेशच्या दिवाकर सिंगचा ३-० असा एकतर्फी पराभव केला होता. आता अंतिम फेरीत यशची गाठ महाराष्ट्राच्या नील जोशी याच्याशी पडणार आहे. यशने सहाव्यांदा या इंडियन ज्युनियर ओपन स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेचे चार वेळा जेतेपद मिळविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.