राज्यातील १००६ मंदिरांचा जीर्णोद्धार करणार असल्याची घोषणा तामीळनाडुच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी काल तामीळनाडू विधानसभेत केली. नियमानुसार दर १२ वर्षांनी मंदिरांचा दुरुस्ती व धार्मिक विधी करावा लागतो असेही त्या म्हणाल्या. गत तीन वर्षांत ५ हजार ३५१ मंदिरांचे सुशोभीकरण व दुरुस्ती केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय राज्यातील आणकी १०६ मंदिरांतून ‘अन्नछत्र’ चालविण्यास सरकार मदत देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.