यंदा अमिताभ बच्चन इफ्फीचे प्रमुख पाहुणे

0
134

यंदा इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आपण व्यक्तिशः त्यांची भेट घेऊन यंदाच्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी यावे यासाठी त्यांना आमंत्रित करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. त्याबाबत अनौपचारिकपणे यापूर्वीच बच्चन यांच्याशी बोलणी झालेली आहेत. मात्र, औपचारिकपणे त्यांच्याशी बोलणी नंतर करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
अमिताभ बच्चन यांचे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबर चांगले संबंध नसल्याने गेली काही वर्षे केंद्रात कॉंग्रेस सरकार असल्याने अमिताभ बच्चन यांना इफ्फीमध्ये सहभागी करून घेण्यात येत नसे. आता पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्याशी अमिताभ बच्चन यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते गुजरातचे ब्रॅण्ड ऍम्बासेडरही आहेत.