गोवा सरकारने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सहावी आणि दहावीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2024-25 मध्ये नववीसाठी एनईपी लागू करण्यात आले होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 नुसार शालेय शिक्षणाचा पायाभूत स्तर (बालवाटिका श्रेणी 1 व 2), आरंभिक स्तर (श्रेणी 3 ते 5), मध्यस्तर (श्रेणी 6 ते 8) आणि माध्यमिक स्तर (श्रेणी 9 ते 12) अशी फेररचना करण्यात आलेली आहे. 3 ते 18 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.
गोवा सरकारने 2023-2024 साली पायाभूत स्तर (बालवाटिका-1) साठी एनईपीची अंमलबजावणी केली होती. 2024-2025 या शैक्षणिक वर्षात बालवाटिका 2 (पायाभूत स्तर) आणि माध्यमिक स्तर नववीसाठी एनईपीची अंमलबजावणी सुरू केली होती. आता 2025-26 या शैक्षणिक वर्षात सहावी आणि दहावीसाठी एनईपीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय
घेतला आहे.