यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

0
3

>> हवामान खात्याचा अंदाज; हंगामात 106 टक्के जास्त पावसाची शक्यता

हवामान खात्याने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. भारतात सरासरीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे मंगळवारी हवामान विभागाने सांगितले. हा अंदाज एप्रिलमध्ये केलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
भारतात दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस 868.6 मिमी आहे. 2025 च्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
हवामान विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान देशाच्या ईशान्य आणि वायव्य भाग वगळता, भारतातील बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. जूनमध्येच, देशात सरासरी 16.7 सेमीपेक्षा कमीत कमी 8 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैमधील पावसाचा अंदाज हवामान विभाग जाहीर करणार आहे.