यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे देशाला संबोधन

0
13

यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी राष्ट्राच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरला असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना संबोधित करताना म्हटले. राम मंदिर लोकार्पण ही ऐतिहासिक घटना असून या सोहळ्याचे आपण साक्षीदार ठरलो असे सांगून राष्ट्रपतींनी महिला विधेयक, जी-20 शिखर परिषद आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपती मुर्मू यांनी, भारत चंद्रावर पोहोचला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला, तोही याचवर्षी. चांद्रयान-3 नंतर इस्त्रोने सौरमोहीमही उघडली. नुकतेच, आदित्य-1 ला हेलो कक्षेमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले. पहिल्या एक्स रे पोलॅरिमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणाने आपल्या वर्षाची सुरुवात झाली असल्याचे या वर्षभरात म्हणजे 2024 मध्ये आणखी मोहिमा काढण्यात येतील असे सांगितले.