यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक

0
3

>> केंद्रिय मंत्री जितीन प्रसाद यांचे प्रतिपादन

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. देशातील सर्व घटकांचा विचार करून अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 संबंधी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना येथे काल केले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचे दोन दिवसाच्या गोवा भेटीवर गोव्यात काल आगमन झाले. अर्थसंकल्प 2025-26 या विषयावर केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी विविध घटकांशी एका खास कार्यक्रमात काल संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची उपस्थिती होती.

यंदाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, ज्यात अर्थसंकल्पावर एकही टीका नाही. 12 लाखांपर्यंत कोणताही कर नाही. याचा सुमारे 7 कोटी लोकांना लक्षणीय फायदा होईल. अर्थसंकल्प पंतप्रधानांच्या सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तन या मंत्राशी सुसंगत आहे, असेही मंत्री प्रसाद यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पात युवा, महिला, किसान आणि गरीब कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गेल्या दशकभरात पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या वर्ष 2025-26 अर्थसंकल्पासाठी राज्यातील विविध घटकांनी सूचना पाठवाव्यात. अर्थसंकल्पासाठी येणाऱ्या सर्व सूचनांचा अर्थसंकल्प तयार करताना विचार केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्याशी महालक्ष्मी-आल्तिनो पणजी येथे संवाद साधला.