म्हापसा शहरात काल कोरोनाचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यात म्हापसा मासळी मार्केटमधील १८ मासळी विक्रेते बाधित सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मागच्या पाच दिवसांपूर्वी मासळी मार्केट संघटनेच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेले १८ पैकी १४ मासळी विक्रेते म्हापसा शहरातील विविध भागामध्ये राहत आहेत. तर ४ मासळी विक्रेते शेजारील गावांतील आहेत. काल मरड २, खोर्ली ४, गणेशपुरी १, दत्तवाडी ३, घाटेश्वर नगर २, आंगड १, करासवाडा ३, आकय १ व डांगी कॉलनी येथे ४ मिळून २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आत्तापर्यंत म्हापसा शहरात २५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.