पोलीस मुख्यालयातून म्हापसा विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांची तडकाफडकी पणजी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. म्हापसा विभागाचा अतिरिक्त ताबा पेडणेचे पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक चोडणकर यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातून दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.